पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान जलवाहिनी जोडणे, जलवाहिनीवर मीटर बसविणे या कारणासाठी गुरुवारी (ता. २०) बहुतांश संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल,
पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद


पुणे, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान जलवाहिनी जोडणे, जलवाहिनीवर मीटर बसविणे या कारणासाठी गुरुवारी (ता. २०) बहुतांश संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रापर्यंत ३ हजार मिमी व्यासाजी जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. खडकवासला धरणातून दोन १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी या ३ हजार मिमी व्यासाच्या जलवाहिनीला जोडण्यात येणार आहे. तसेच त्यावर फ्लो मीटर बसविण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर रस्त्यावर भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या भागातील पाणी पुरवठा गुरूवारी सुरू राहणार आहे. तेथे कोणताही अडथळा येणार नाही. उर्वरित शहराच्या भागात गुरुवारी पाणी बंद असेल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande