पुणे : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलतीची मागणी
पुणे, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेने मिळकतकर थकबाकीदारांना दंडामध्ये ७५ टक्के सुट दिली. पैसे भरण्यासाठी आलेल्यांचा सन्मान केल्यानंतर नियमित कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाल आहे.त्यामुळे आता नियमित कर दात्यांना करामध्ये २० ते २५
PMC news


पुणे, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेने मिळकतकर थकबाकीदारांना दंडामध्ये ७५ टक्के सुट दिली. पैसे भरण्यासाठी आलेल्यांचा सन्मान केल्यानंतर नियमित कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाल आहे.त्यामुळे आता नियमित कर दात्यांना करामध्ये २० ते २५ टक्के सवलत द्या अशी मागणी सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी केली आहे. त्यावर आता प्रशासन निर्णय घेणा का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान अभय योजनेतून आत्ता पर्यंत २ हजार ५९८ मिळकतधारकांनी केवळ १५ कोटी २७ लाखांची थकबाकी जमा केली आहे. महापालिकेच्या तिजोरीत विकास कामासाठी पैसे शिल्लक नसल्याने अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अभय योजनेतून ५५२९ कोटी रुपयांची थकबाकी वसूल होऊ शकते.त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा झाल्याने विकास प्रकल्पांना, रस्त्याची जागा भूसंपादन करण्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. यापूर्वीच्या चार अभय योजनांमधून सुमारे ६२५ कोटी रुपयेच वसूल झालेले असताना आता यावेळी किती पैसे वसूल होणार याकडे लक्ष लागले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande