
पुणे, 18 नोव्हेंबर (हिं.स.)पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बसेसना नवीन मार्ग, थांबेव्यवस्था आणि पिक अवर्समध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू केली असून, नागरिकांकडून हरकती सूचना मागवून अंतिम आदेश लवकरच जाहीर केला जाणार आहे.रस्त्यावर होणारी बसेसची गर्दी आणि पिक अवर्समध्ये कोंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्या कार्यालयात ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात झालेल्या चर्चेनुसार नवा आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी सुरू केली आहे.पुढील १५ दिवसांत नागरिक, संस्थांकडून हरकती सूचना मागविण्यात येतील. त्यानुसार अंतिम आदेश काढण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु