
सोलापूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)राज्यात भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांची महायुती घट्ट होती. पण, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळ्याच पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. विशेष बाब म्हणजे सर्वांचा डोळा नगराध्यक्षपदावरच असल्याचे दिसून आले.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच भाजपने सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एकमेव अनगर नगरपंचायतीत कमळ चिन्हावरील नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले आहेत. दुसरीकडे अन्य कोणत्याही पक्षाला सगळीकडे उमेदवार मिळालेले नाहीत .
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड