
सोलापूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर महापालिका निवडणुकीचे नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण सोडत पुन्हा काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने सोलापूर महापालिकेसह इतर काही महापालिकांची आरक्षण सोडत पुन्हा काढण्यात आली.महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत ही सोडत झाली. यापूर्वी प्रभाग 24 मध्ये ओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडले होते. त्या जागेवर आता ओबीसी महिलेसाठी थेट आरक्षण पडले. यामुळे भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना धक्का बसला त्यांनी आयुक्तांकडे या प्रक्रियेला विरोध केला. आणि हरकत घेतली. आरक्षण सोडतीवर नाराजी व्यक्त करताना प्रभाग 24 चे आरक्षण सोडत चिठ्ठी द्वारे काढण्याची मागणी केली.पण आयुक्तांनी नंतर हरकत घ्यावी असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड