सोलापूर - परिवहन महामंडळ उभारणार 251 पेट्रोल पंप
सोलापूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य परिवहन महामंडळाकडून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठी महामंडळ व्यवस्थापनाने राज्यातील विविध 251 ठिकाणी सीएनजीसह पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रीक चार्जिंग पॉईंट सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सोलापूर - परिवहन महामंडळ उभारणार 251 पेट्रोल पंप


सोलापूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य परिवहन महामंडळाकडून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठी महामंडळ व्यवस्थापनाने राज्यातील विविध 251 ठिकाणी सीएनजीसह पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रीक चार्जिंग पॉईंट सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या माध्यमातून महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडण्यास मदत होणार आहे. व्यवस्थापनाकडून निविदा प्रक्रियाही राबवण्याची प्रक्रियेला वेग आले आहे.परिवहन महामंडळाच्या स्तरावरून उत्पन्न वाढीसाठी अनेक मार्ग शोधले जात जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काळात पेट्रोल, डिझेल पंप सुरू करत त्याच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती. त्यानुसार यासाठीची प्रक्रिया आता सुरू केली आहे. उत्पन्नाचा नवा मार्ग निर्माण करण्याच्याच उद्देश्याने महामंडळाच्या मालकीच्या जागेवर 251 पेक्षा अधिक ठिकाणी हे पंप उभारले जाणार आहे. तसेच, व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेल यासह सी.एन.जी. आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू केला जाणार आहे.महामंडळाने 251 पेक्षा जास्त जागांवर व्यावसायिक तत्वावर समुदाय इंधन विक्री केंद्र उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया देखील सुरू केली आहे. ज्या ठिकाणी महामंडळाच्या बसेससाठी इंधन भरले जाते. तिथेच, सामान्य ग्राहकालाही किरकोळ पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची विक्री करणे शक्य होईल. मागील 70 वर्षाहून जास्त वर्षे परिवहन महामंडळ इंडियन ऑईलसह हिंदुस्तान व भारत पेट्रोलियम आदी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande