
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील दहा नगर परिषद व दोन नगर पंचायतच्या नगराध्यक्ष व सदस्य पदाकरीता दाखल नामनिर्दे शन पत्राच्या छाननी अंती अध्यक्ष पदाचे १९ तर सदस्य पदाचे २९५ अर्ज अवैध ठरले आहेत. आता अध्यक्षपदासाठी रिंगणात १०८ तर सदस्य पदांकरीता १५१६ अर्ज वैध ठरले आहेत.
अध्यक्ष पदाकरीता वैध अर्जाची संख्या (कंसात सदस्य पदाचे वैध अर्ज) नगर पंचायतनिहाय नांदगावखंडेश्वर ११ (७८), धारणी १३ (८८), नगरपरिषदनिहाय शेंदुरजनाघाट ६ (८७), चिखलदरा ५ (५३),पत्र वैध झाले आहे. १७ नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदासाठी व १९ प्रभागाकरीता एकुण १०९ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत ९९ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध झाले, तर १० उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध झाले आहे. वैध झालेल्या उमेदवारांची यादी निवडणुक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्द केली आहे. १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे. वैधरित्या नामनिर्देशीत केलेल्या उमेदवाराची यादी प्रसिध्द झाल्यापासून ३ दिवसाच्या आत जिल्हा न्यायधिशाकडे अपील करता येणार आहे. त्याकरीता २१ ते २५ नोव्हेंबरपर्यंत अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल, त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी व २५ नोव्हेंबरपर्यंत निकाल देण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरला निवडणुक चिन्हे वाटप व अंतिमरित्या निवडणूकं लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतदान २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत राहणार आहे. मतमोजनी ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
अंजनगावसुर्जीत सर्वाधिक ७७ अर्ज अवैध
▲ नामनिर्देशपत्राच्या छाननीत अंजनगावसुर्जी येथील सदस्य पदाचे सर्वाधिक ७७ तर अध्यक्षपदाचे दोन अर्ज अवैध ठरविण्यात आले. अध्यक्ष व सदस्यपदाची अवैध ठरलेली अर्जसंख्या नगर परिषदनिहाय नांदगाव खंडेश्वर : सदस्य-९, धारणी अध्यक्ष ३, सदस्य ४२, शेंदुरजनाघाट सदस्य ७, चिखलदरा सदस्य ६, चांदूरबाजार अध्यक्ष ३, सदस्य ५, चांदूररेल्वे सदस्य १०, मोर्शी अध्यक्ष २, सदस्य २९, वरुड अध्यक्ष ३, सदस्य ३३, धामणगावरेल्वे सदस्य ५, दर्यापूर सदस्य १२, अचलपूर अध्यक्ष ६, सदस्य ६० अशी आहे.
(कलर बॉक्स)अध्यक्षपदाचे अवैध अर्ज
▲ नगरपंचायत धारणी, नगर परिषद चांदूरबाजार, वरुड येथील प्रत्येकी तीन, मोर्शी व अंजनगासुर्जी येथील प्रत्येकी दोन आणि अचलपूर येथील सहा अर्ज अवैध ठरले आहेत. त्याचवेळी सदस्यपदासाठी नांदगाव खंडेश्वर (९), धारणी (४२), शेंदुरजनाघाट (७), चिखलदरा (६), चांदूरबाजार - (५), चांदूररेल्वे (१०), मोर्शी (२९), वरूड (३३), धामणगावरेल्वे (५), दर्यापूर (१२), अचलपूर (६०), अंजनगासुर्जी ७७ अर्ज अवैध ठरले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी