अमरावती : २१ ते २३ नोव्हेंबर श्री अंबादेवी संगीत समारोह
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)यावर्षीचा श्री अंबादेवी संगीत समारोह 21 ते 23 नोव्हेंबर 25 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. शुक्रवार 21 नोव्हेंबरला सायं. 6.30 वा. पं रघुनंदन पणशीकर, पुणे यांचेशास्त्रीय, उपशास्त्रीय गायन होईल. दुसऱ्या सभेत रात्री 8.30
२१ ते २३ नोव्हेंबर श्री अंबादेवी संगीत समारोह


अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)यावर्षीचा श्री अंबादेवी संगीत समारोह 21 ते 23 नोव्हेंबर 25 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. शुक्रवार 21 नोव्हेंबरला सायं. 6.30 वा. पं रघुनंदन पणशीकर, पुणे यांचेशास्त्रीय, उपशास्त्रीय गायन होईल. दुसऱ्या सभेत रात्री 8.30 वा सुश्री रागेश्री दास कोलकता यांचे उपशास्त्रीय गायन त्यात दादरा, ठुमरी, कजरी गायनप्रकार सादर करतील. शनिवार 22 नोव्हेंबरला सायं. 6.30 वा धारवाड येथील पं कुमार मरडूर यांचे शास्त्रीय उपशास्त्रीय गायन होईल. तर रात्री 8.30 आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक पं पूर्बयान चॅटर्जी यांचे सतारवादन होईल. त्यांना. तबला संगत श्री ओजस अढिया, हे करतील. रविवार 23 नोव्हेंबरला सायं. 6.30 वा. स-श्री रंजनी व गायत्री चेन्नई, जुळ्या भगिनींचे शास्त्रीय गायन होईल. समारोपीय सत्रात कोलकता येथील सुप्रसिद्ध तबलावादक पं अनिंदो चॅटर्जी व त्यांचे सुपुत्र श्री अनुव्रता चॅटर्जी यांचे तबला सहवादन होईल.अंबागेटजवळील श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात आयोजित या निशुल्क समारोहात रसिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन श्री अंबादेवी संस्थान विश्वस्त मंडळाने केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande