अमरावती : सराईत गुन्हेगारावर कारवाई करा- पोलीस आयुक्त
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व ठाणेदारांसह शाखा प्रमुखांची बैठक घेतली. निवडणुक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात व्हावी, याकरीता ठाणेदारांनी आपापल्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची
सराईत गुन्हेगारावर कारवाई करा : पोलीस आयुक्त अरविंद चावरिया


अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.)पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व ठाणेदारांसह शाखा प्रमुखांची बैठक घेतली. निवडणुक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात व्हावी, याकरीता ठाणेदारांनी आपापल्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी तिन्ही पोलीस उपायुक्त व सर्व ठाणेदार उपस्थीत होते.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाने कंबर कसली असून आतापासूनच शहरातील प्रत्येक परिसराचा आढावा घेतला जात आहे.निवडणुक भयमुक्त वातावरणात व्हावी यादीने आयुक्तालयातील प्रत्येक ठाणेदारांनी आपापल्या हद्दीतील सराईत व कुख्यात गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांची माहिती घेण्यास आयुक्तांनी सांगितले. जे गुन्हेगार राजकीय नेत्यांच्या जवळचे आहेत, अशा गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवून ते काय करतात, कोणासोबत राहतात, त्यांचा आर्थिक स्त्रोत काय आहे, अशा सर्व बाबींची पोलीस गुप्त माहिती घेत आहेत. तसेच शहरातील सर्व गुन्हेगारांच्या भूतकाळातील आणि सध्याच्या नोंदी तपासण्यापासून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आयुक्तांनी सांगितले.शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी पोलीस बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. कोणत्याही प्रकारची हालचाल आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी बैठकीत दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे आगमन लक्षात घेता शहरात तगडा बंदोबस्त तैनात करावा. तसेच विशेष शाखेसह प्रत्येक ठाण्यातील खुपिया यांनी आपापल्या हद्दीत विशेष लक्ष ठेवावे आणि काही आढळल्यास तत्काळ वरिष्ठांना माहिती द्यावी, असे निदेश पोलीस आयुक्तांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande