
अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.)
जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, दर्यापूर, चांदूरबाजार चिखलदरा सुरु धामणगाव रेल्वे, मोशी, चांदूर रेल्वे आणि शेंदूरजना घाट या दहा नगर परिषद आणि धारणी आणि नांदगाव खंडेश्वर या दोन नगर पंचायतीची निवडणूक रणधुमाळी आता झाली आहे. नामांकन दाखल आणि नामांकन छाननी प्रक्रिया आटोपल्यानंतर आता १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत आहे. यानुसार नामांकन परत घेण्याच्या पहिल्यादिवशी बुधवार १९ नोव्हेंबरलाएकूण ७ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. यात नगराध्यक्षपदाचे २ तर सदस्य पदासाठी ५ जणांनी निवडणूक मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. नामांकन मागे घेण्याकरिता आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने दोन दिवसांत किती उमेदवार निवडणुकीचे मैदान सोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्ष १०८, सदस्यपदासाठी १५१६ वैध (हेडिंग मागे बॉक्सघेणे)
जिल्ह्यात १० नगरपरिषद, २ नगर -पंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीकरिता १२ अध्यक्षपदासाठी १२७ नामांकन प्राप्त झाले होते. छाननी दरम्यान यातील १९ अर्ज अवैध ठरल्याने नगराध्यक्षपदासाठी १०८ उमेदवारी अर्ज शिल्लक राहीले होते. तसेच सदस्यपदाकरिता १८२१ नामांकन प्राप्त झाले असतांना यातील 295 नामांकन अवेध ठरल्याने सदस्यांकरीता 1516 नामांकन शिल्लक होते.
७ जणांची माघार
अचलपूर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाच्या २ तर सदस्य पदाच्या एकाने आपले नामांकन परत घेत निवडणूक लढण्याचा विचार बदलविला. तर दर्यापूर नगर परिषदेत सदस्यपदाच्या एकाने नामांकन परत घेतले. तसेच मोर्शी नगर पंचायतीमध्ये सदस्यपदा साठीचे ३ नामांकन मागे घेण्यात आले आहे.
... तर २५ नोव्हेंबरपर्यंत संधी
त्यामुळे या उमेदवारांना अपील नसेल तेथे १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे. परंतु जेथे अवैध नामांकनाबाबत अपील दाखल आहेत तेथे २५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. बुधवारी नामांकन रद्द करणाऱ्यांमधून एकही अपील दाखल करण्यात आली नव्हती.
आणखी दोन दिवस शिल्लक
तर नामांकन मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी अध्यक्षांचे दोन व सदस्यांमधुन पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे सद्यास्थितीत अध्यक्षपदाकरिता १०६ तर सदस्यपदाकरिता १५११ उमेदवार रिंगणात आहेत. या दोन दिवसांत यामधुन किती उमेदवार निवडणूक मैदान सोडतात याकडे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी