अहमदपूरचे नाव ‘राजूर’ करा; भाजपच्या वतीने मागणी
लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वप्निल व्हत्ते यांनी अहमदपूर शहराचे सध्याचे नाव ‘अहमदपूर’ यावर तीव्र आक्षेप नोंदवत, त्याऐवजी शहराला ‘राजूर’ असे ऐतिहासिक नाव देण्याची मागणी केली आहे.​ ​स्वप्निल
भाजप उमेदवाराने विकासासोबतच शहराच्या मूळ अस्मितेला हात घातल्यामुळे आगामी निवडणुकीत नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता असून राजकीय वातावरण तापले आहे.


लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वप्निल व्हत्ते यांनी अहमदपूर शहराचे सध्याचे नाव ‘अहमदपूर’ यावर तीव्र आक्षेप नोंदवत, त्याऐवजी शहराला ‘राजूर’ असे ऐतिहासिक नाव देण्याची मागणी केली आहे.​ ​स्वप्निल व्हत्ते यांनी त्यांच्या मागणीमागील ऐतिहासिक कारण स्पष्ट केले. त्यांच्या मते, शहराचे सध्याचे नाव एका अत्याचारी मोघल व्यक्तीच्या मुलाच्या नावावर आधारित आहे.

​मोघलांच्या काळात 'राजुर' येथील एक अत्याचारी व्यक्ती होता. त्याच्या पत्नीला जो मुलगा झाला, त्याचे नाव 'अहमद' होते आणि याच नावावरून शहराला 'अहमदपूर' नाव पडले. त्या अत्याचारी व्यक्तीचा त्रास केवळ हिंदू धर्मालाच नव्हे, तर मुस्लिम समाजालाही होता. त्यामुळे त्या अत्याचारी माणसाच्या मुलाचे नाव आमच्या शहराला राहू नये म्हणून आमची प्रतिक्रिया आहे की या शहराला अहमदपूर ऐवजी राजूर नाव व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. ​नामांतराच्या मागणीसोबतच व्हत्ते यांनी शहराच्या विकासाचा आपला अजेंडाही स्पष्ट केला. ‘राजूर शहराला मोकळा श्वास घेता येईल’ अशी व्यवस्था निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भगिनींना सर्व व्यवस्था व्यवस्थित वापरता याव्यात यासाठी सुविधा.​ वयोवृद्ध नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र (उद्यान) स्थापन करणार. शहरात एक सुसज्ज वाचनालय देखील स्थापन करण्याचा मानस आहे ​यावेळी व्हत्ते यांनी माहिती दिली की, येत्या दोन दिवसात भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित केला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande