
लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।अहमदपूरमध्ये भाजपचा बालेकिल्ला अभेद्य करण्याचा निर्धार एका बैठकीमध्ये करण्यात आला .लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीत पक्षाला निर्णायक यश मिळवून देत अहमदपूर शहराला पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला बनवण्याचा ठाम निर्धार सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.बैठकीला लातूर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील, माजी मंत्री तथा निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आगामी निवडणूक ही केवळ सत्ता परिवर्तनाची नसून, अहमदपूरच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासासाठी निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट केले. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून, एक संघटित, नियोजनबद्ध आणि दमदार लढत देण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या विकासवादी भूमिकेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याचा आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा संकल्प बैठकीत उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला गोविंदअण्णा केंद्रे, दिलीपराव देशमुख, राजकुमारजी मजगे, गणेश हाके, बसवराज पाटील कौळखेडकर, तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, ॲड. भारतजी चामे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. स्वप्नीलजी व्हत्ते, सिद्धेश्वर पवार, रणजीत मिरकले, मनिषा नवने यांच्यासह पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार, सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले गेल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis