चांदूर रेल्वेत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस समोर काँग्रेसचेच आव्हान
निवडणुकीची राजकीय रणधुमाळी‎ अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। काँग्रेस पक्षात असतानाच सहकार क्षेत्रात कार्यरत हर्षल वाघ काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या वेळी त्यांनी त्यांच्या पत्नी पूजा हर्षल वाघ यांच्यासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितल
चांदूर रेल्वेत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेससमोर काँग्रेसचेच आव्हान चांदूर रेल्वेत निवडणुकीची राजकीय रणधुमाळी‎


निवडणुकीची राजकीय रणधुमाळी‎

अमरावती, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।

काँग्रेस पक्षात असतानाच सहकार क्षेत्रात कार्यरत हर्षल वाघ काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या वेळी त्यांनी त्यांच्या पत्नी पूजा हर्षल वाघ यांच्यासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली होती, परंतु पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत पत्नी पूजा हर्षल वाघ यांची अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांच्या या कृतीमुळे काँग्रेससमोर तूर्त काँग्रेससचेच आव्हान उभे ठाकले आहे.

दरम्यान स्वतः हर्षल वाघ यांनीही प्रभाग क्रमांक चार मधून नगरसेवक पदासाठी उभे आहे. चांदूर रेल्वे नगरपालिकेत एकूण २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडायचा आहे. दहा प्रभागांसाठी ही निवडणूक होत असून, नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी ९९ उमेदवार मैदानात उतरले आहेत. येथील नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उबाठा) आम आदमी पार्टीने उमेदवार उभे केले असून, अपक्ष पूजा हर्षल वाघ यांनी आव्हान उभे केले आहे. दरम्यान नगरसेवक पदासाठी कोणत्याही पक्षात बंडखोरी झाली नाही, मात्र मागील तीन दिवसापासून काही पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे. सद्यःस्थितीवरुन असे लक्षात येते की चांदूर रेल्वे नगरपरिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

हे आहेत अध्यक्ष पदाचे उमेदवार

भाजप- स्वाती मेटे

काँग्रेस - पूनम सूर्यवंशी

वंचित- प्रियंका विश्वकर्मा

आम आदमी पक्ष - नम्रता गवळी

अपक्ष - पूजा वाघ

शिवसेना (उबाठा) - भावना यादव

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande