
नाशिक, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।
- प्रसिद्ध बिल्डर आणि सामाजिक कार्यकर्ते नेमिचंद ललित प्रसाद पोद्दार यांचे गुरुवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयामध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बिल्डर व्यवसायाबरोबरच अनेक सामाजिक संघटनांचा मार्गदर्शक हरपला आहे.
जिल्ह्यातील बिल्डर व्यवसायाबरोबर अनेक सामाजिक संघटनांमध्ये जोडले गेलेले नेहमीचं नेमिचंद पोद्दार यांनी नुकतीच 74 वी पूर्ण केली होती आणि 75 वी सुरू झाली होती. मागील काही महिन्यांपासून ते सातत्याने आजारी होते त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती परंतु नंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. नेमीचंद पोद्दार यांच्या निधनामुळे मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी ,तीन मुलं, सुना, नातवंड, असा परिवार आहे. त्यांच्यावरती नाशिकच्या अमरधाम मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
नेमिचद पोद्दार यांनी आपल्या वडिलांबरोबर कापड व्यवसायामध्ये व्यवसायाला सुरुवात केली मेन रोडवरील पोद्दार स्टोअर्स येथून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर हा व्यवसाय करतानाच त्यांनी सर्वसाधारण 1982 च्या सुमारास आपला स्वतःचा लँड डेव्हलपिंगचा व्यवसाय सुरू केला पोद्दार बिल्डर या नावाने हा व्यवसाय आहे सुरू झाला. पुढे बघता बघता या व्यवसायाला चांगली झळाली मिळाली आणि त्यांचे मोठे नाव झाले. या व्यवसायाबरोबरच सर्वांचे आवडते असलेले नेमीचदभाई हे विविध सामाजिक संघटनांची जोडले गेले त्यामुळे त्यांची सामाजिक कार्याचे आवड देखील पुढे आले आणि अनेक सामाजिक संघटनांना त्यांनी आधार दिला. जेसीसी या संघटनेचे ते राज्य अध्यक्ष होते . प्रोमाईटर बिल्डर अँड असोसिएशन, नरेडको, यासह विविध संघटनांची ते जोडले गेलेले होते सर्व साधारण 2004 पासून त्यांनी नंदिनी गोशाळा सुरू केली होती दहा गाईंपासून सुरू केलेली ही गोशाळा मोठ्या प्रमाणावरती विकसित झाली आज या ठिकाणी शेकडोगाई आहेत . त्या गाईंची सेवा ते करत होते. त्याचबरोबर वनवासी कल्याण आश्रम सारख्या संस्थांबरोबर ही ते जोडले गेले होते. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थानचे आश्रय दाते म्हणून होते.
आधारवड हरपला
सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध बिल्डर व्यवसाय नेमिचद भाई पोद्दार यांच्या निधनामुळे बिल्डर सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली असून विविध संघटनांचा आधारवड हरपला आहे अशी श्रद्धांजली ज्योतिष स्टोअर चे संचालक वसंत खैरनार यांनी व्यक्त केली
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV