लातूर: मुला-मुलींच्या इंटर कॉलेजिएट कबड्डी स्पर्धेचे शुक्रवारपासून भव्य आयोजन
लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे यांच्या अधिपत्याखाली विलासराव देशमुख फाउंडेशन, स्कूल ऑफ फार्मसी, लातूरतर्फे मुला-मुलींच्या इंटर कॉलेजिएट कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ व २२
लातूर: मुला-मुलींच्या इंटर कॉलेजिएट कबड्डी स्पर्धेचे शुक्रवारपासून भव्य आयोजन


लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे यांच्या अधिपत्याखाली विलासराव देशमुख फाउंडेशन, स्कूल ऑफ फार्मसी, लातूरतर्फे मुला-मुलींच्या इंटर कॉलेजिएट कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ व २२ नोव्हेंबर रोजी विलासराव देशमुख फाउंडेशन स्पोर्ट्स ग्राउंड, न्यू. एमआयडीसी, एअरपोर्ट रोड, लातूर येथे होणार आहे.

डीबीएटीयू अंतर्गत असलेल्या सर्व संलग्न महाविद्यालयांचा या ‘मेगा स्पोर्ट्स इव्हेंट’मध्ये सहभाग असणार आहे. यावर्षीची ही क्रीडा स्पर्धा भव्य, उत्साहवर्धक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेचा शुभारंभ सोहळा २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास डीबीएटीयू, लोणार कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रवीण सरदेशमुख, व्हीडीएफचे विश्वस्त किरण जाधव, व्हीडीएफचे विश्वस्त अ‍ॅड. समद पटेल, व्हीडीएफचे विश्वस्त विजय देशमुख, सोलापूर विभागीय क्रीडा सचिव सचिन गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे.

या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. वाकुरे आणि क्रीडा समन्वयक प्रा. विक्रम वाघमारे यांनी लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतील सर्व सहभागी पथकांना आमंत्रण दिले आहे. सहभागी सर्व खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन विलासराव देशमुख फाउंडेशन, स्कूल ऑफ फार्मसी, लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande