लातूर जिल्ह्यात ५८ उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुक रिंगणात
लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा नगरपालिकेची आणि रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी ९५ अर्ज दाखल झाले होते. अर्जांच्
लातूर जिल्ह्यात ५८ उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुक रिंगणात


लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा नगरपालिकेची आणि रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी ९५ अर्ज दाखल झाले होते. अर्जांच्या छाननीत ३७ अर्ज बाद झाल्याने आता ५८ उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुक रिंगणात असून सदस्य पदाच्या ११३७ अर्जांपैकी ४१४ अर्ज बाद झाले. त्यामुळे आता ७२३ सदस्य उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत.

उदगीर नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी २० अर्ज दाखल झाले होते. छाननीत त्यातील १० अर्ज अवैध तर १० अर्ज वैध ठरले आहेत. अहमदपूर नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी १४ अर्ज दाखल झाले होते. त्यातील १ अर्ज अवैध तर १३ अर्ज वैध ठरले. निलंगा नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी २९ अर्ज दाखल झाले होते. त्यातील १८ अर्ज अवैध तर ११ अर्ज वैध ठरले. औसा नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी १५ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ४ अवैध तर ११ वैध ठरले आहेत. रेणापूर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी १७ अर्ज दाखल झाले होते. ४ अर्ज अवैध तर १३ अर्ज वैध ठरले आहेत. चार नगरपालिका व एक नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ५८ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

उदगीर नगरपालिका सदस्यपदासाठी ३५८ अर्ज दाखल झाले होते. छाननीत त्यातील १२२ अवैध तर २३६ अर्ज वैध ठरले. अहमदपूर नगरपालिका सदस्यपदासाठी २४० अर्ज दाखल झाले होते. त्यातील ५७ अर्ज अवैध तर १८३ अर्ज वैध ठरले आहेत. निलंगा नगरपालिका सदस्यपदासाठी २३४ अर्ज दाखल होते. त्यातील १३५ अर्ज अवैध तर ९९ वैध अर्ज वैध ठरले आहेत. औसा नगरपालिका सदस्यपदासाठी १४६ अर्ज दाखल होते. त्यातील ५५ अवैध तर ९१ वैध ठरले आहेत. रेणापून नगरपंचायत सदस्यपदासाठी १५९ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ४५ अर्ज अवैध तर ११४ अर्ज वैध ठरले आहेत. चार नगरपालिका व एक नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता ५८ उमेदवार तर सदस्यपदाच्या निवडणुकीत ७२३ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande