
लातूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सुचना दि. २७ नोव्हेंबरपर्यंत दाखल करता येणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून तो खालीलप्रमाणे आहे. निवडणूक आयोगाने अधिसुचीत केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार केलेली प्रारुप मतदार यादी, हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिद्ध मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दि. २७ नोव्हेंंबर. प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करणे. दि. ५ डिसेंबर.
मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे. दि. ८ डिसेंबर. ५ मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे दि. १२ डिसेंबर. दि. २० ते २७ नोव्हेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. सदर हरकती सुचना लेखी स्वरूपात महानगरपालिका निवडणूक शाखा व झोन कार्यालय येथे हरकती व सूचना स्विकारण्या जाणार आहेत. तसेच महानगरपालिका निवडणूक विभाग येथे प्रभाग १ ते १८ ची प्रारुप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहे, झोन ‘ए’ प्रभाग क्रमांक १०,११,१२,१३,१४, झोन ‘बी’ १५,१६,१७,१८ झोन ‘सी’ ३,४,५,६ झोन ‘डी’ १,२,७,८,९ येथे या प्रभागाच्या याद्या ठेवण्यात आल्या आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis