नाशिक : पंचवटीच्या मोरेमला परिसरात बिबट्या जेरबंद
नाशिक, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : - शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या हनुमानवाडी परिसरामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला असून त्याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे पुढील कारवाईसाठी वन्य प्राणी उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेले
पंचवटीतील मोरे मला परिसरात बिबट्या जेरबंद


नाशिक, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : - शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या हनुमानवाडी परिसरामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला असून त्याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे पुढील कारवाईसाठी वन्य प्राणी उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. नाशिक शहर आणि परिसरामध्ये सातत्याने मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर येत आहेत अगदी चार दिवसांपूर्वीच शहरातील भोसला मिलिटरी कॉलेज पाठीमागे असलेल्या वस्तीमध्ये बिबट्याने हल्ला करून वनविभागाच्या कर्मचाऱ्यासह काही नागरिकांना जखमी केल्याची घटना ताजी होती. त्यानंतर तातडीने वनविभागाने या ठिकाणी वन अधिकारी सुमित निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या अवघ्या तीन तासाच्या ऑपरेशन नंतर हा बिबट्या जेरबंद केला होता त्यानंतर याच परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या आल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती त्यानंतर वनविभागाचे वन अधिकारी सुमित निर्मळ यांनी या ठिकाणी ड्रोन कॅमेरा व कर्मचाऱ्यांच्या मदतीने तसेच नागरिकांना मार्गदर्शन करत या परिसरात सर्च ऑपरेशन केले होते. या ठिकाणी बिबट्या नव्हता मात्र या ठिकाणी रानमंदिर आढळून आले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मध्यवस्ती असलेल्या पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोडवरील हनुमान वाडी परिसरातील शिंदे मळा या ठिकाणी आज गुरुवारी सकाळी आप्पासाहेब शिंदे यांच्या शेतामध्ये अंदाजे तीन ते चार वर्ष असलेली मादी ही वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये रेस्क्यू झालेली आहे. याबाबतच्या तक्रारी या 15 नोव्हेंबर रोजी वनविभागाकडे आल्यानंतर या परिसरामध्ये बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात आलेल्या होता त्या पिंजऱ्यामध्ये आज सकाळी ही मादी जीरबंद झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन अधिकारी सुमित निर्मळ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन या मादीला पुढील प्राथमिक तपासणी व कारवाईसाठी म्हणून म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रामध्ये दाखल केलेले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande