मनमाडमधील भाजपच्या ५० पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे तडकाफडकी राजीनामे
मनमाड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।नगरपरिषद निवडणुक निर्णायक टप्प्यावर असताना भाजपला मोठा धक्का बसला असून शहरातील सुमारे ५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या २५ वर्षांपासून मनमाड नगरपरिषदेत एकही नगरसेवक निवडून न आण
मनमाडमधील भाजपच्या ५० पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे तडकाफडकी राजीनामे


मनमाड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।नगरपरिषद निवडणुक निर्णायक टप्प्यावर असताना भाजपला मोठा धक्का बसला असून शहरातील सुमारे ५० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पक्षाला रामराम ठोकला आहे. गेल्या २५ वर्षांपासून मनमाड नगरपरिषदेत एकही नगरसेवक निवडून न आणू शकणाऱ्या पक्ष नेतृत्वाच्या कामगिरीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राजीनामा देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्याकडे सादर केलेल्या पत्रात स्पष्ट केले की, तेच तेच कर्तव्यशून्य जिल्हा पदाधिकारी, तेच स्थानिक नेतृत्व, निष्ठावंत कार्यकर्त्यांना सतत बाजूला सारण्याची वृत्ती आणि २५ वर्षांपासून नगरपरिषदेत प्रतिनिधी न निवडून आणण्याची दयनीय स्थिती यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे या पत्रात नमूद केले आहे. तसेच वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठ नेतृत्वाने दखल न घेतल्याने - हा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे भाजप मंडल (पूर्व) चे माजी अध्यक्ष सचिन संघवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande