परप्रांतीय कंपनीची मुजोरी मोडीत,मराठी कामगारांना मिळवून दिला न्याय!
अकोला, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।परप्रांतीय कंपनी व्यवस्थापनाची मुजोरी मोडीत काढत अकोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक मराठी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, हैद्राबाद या सोलर कंपनीत CISB सिक्युरिटी
प


अकोला, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।परप्रांतीय कंपनी व्यवस्थापनाची मुजोरी मोडीत काढत अकोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक मराठी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, हैद्राबाद या सोलर कंपनीत CISB सिक्युरिटी मार्फत काम करणाऱ्या सुमारे ४० मराठी कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले होते.

या अन्यायाची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तात्काळ कंपनीतील संबंधित व्यवस्थापकांची ‘मनसे स्टाईल’ने कडक शब्दांत विचारणा केली. कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास कंपनीचे काम बंद पाडू, असा ठाम इशारा मनसेने दिला. मनसेच्या या भूमिकेनंतर कंपनीने माघार घेत सर्व ४० कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय केला.मनसेच्या पुढाकारामुळे अन्यायीपणे कामावरून काढलेल्या सर्व मराठी कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला आहे.या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत, जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, मनविसे तालुकाध्यक्ष सौरभ फाले, हर्षल अंभोरे, राजेश राठी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande