'लाडकी बहीण' योजना बंद पडू देणार नाही- देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण बंद पडू देणार नाही!
अकोला, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार जोर धरत असून अकोल्यातील हिवरखेड येथे आज हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट या तिन्ही नगरपरिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली.यावेळी बोलताना फडणवीस
प


अकोला, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार जोर धरत असून अकोल्यातील हिवरखेड येथे आज हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट या तिन्ही नगरपरिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली.यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की,

विरोधकांकडून ‘लाडकी बहिण योजना’ बंद होणार असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप हित आल्याने जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही,”अशी ग्वाही त्यांनी दिली. सभेला मोठी गर्दी उपस्थित राहिली असून निवडणूक प्रचाराला यामुळे आणखी वेग येणार असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपच्या उमेदवाराची चिंता तुम्ही करा आणि आम्ही तुमची पाच वर्षे चिंता करू त्यांना विजयी करा विकासाचा अजेंडा व कामे करून घेण्याची ताकद आमच्यात असून संपूर्ण विकास करण्या भाजपाचा संकल्प आहे. त्यासाठी हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट येथे नगराध्यक्ष सह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांना विजयी करा असे आव्हान राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिवरखेड इथे केवलराव देशमुख यांच्या मळा येथे हिवरखेड, तेल्हारा, अकोट नगरपालिकेच्या भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद मतदार विजय संकल्प सभेत ते बोलत होते. मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार संजय कुटे, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर विजय अग्रवाल अनिल काळे, अनिल गावंडे, सुलभा दुतोंडे नगराध्यक्ष उमेदवार, मायाताई घुले, वैशालीताई पालीवाल शेंडे मंगेश टावरी गणेश रोटे गोपाल मोहोळ अनिल गावंडे आदी मंचावर विराजमान होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात शहरी आणि ग्रामीण विकासाचा संकल्प व विकास सुरुवात या विकासाला ट्रिपल इंजन लावण्यासाठी तसेच नागरी समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेले पैसे विकासाच्या कामाला लावण्यासाठी आपण इथे भारतीय जनता पक्षाला विजयी करा. हिवरखेड अकोट तेलारा रोड करण्यात येईल तसेच रेल्वे लाईन काम होऊन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करणार आहेत तसेच शेतकरी हितार्थाने कामे घेण्यात करण्यात येईल असेही अभिवचन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. यावेळी पालकमंत्री आकाश कुंडकर यांनी जोश पूर्ण भाषणात भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले तर प्रास्ताविक खासदार अनुप धोत्रे यांनी यांनी केले तर आमदार प्रकाश भारताकलेडे यांनी हिवरखेड तेलारा अकोट या भागातील अनेक समस्या संदर्भात मागणी केली आणि त्यासंदर्भात त्याला सकारात्मक उत्तर मुख्यमंत्री यांनी देऊन आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या कार्याची प्रसंसाचा केली.

आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात तसेच खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या प्रयत्नाने हिवरखेड येथे भव्य दिव्य सभा ऐतिहासिक सभा झाली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील आणि तेल्हारा, हिवरखेड आणि अकोट नगरपालिका क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाच्या या नियोजनामध्ये 2000 कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

यावेळी चांदीची गदा त्याच्यावर कमळ असलेलं भाजपाच्या वतीने देण्यात मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

आमदार सावरकर यांनी उपस्थित कार्यकर्ते तसेच मतदारांना त्यांना प्रत्येक मैदानावर जाऊन वंदन नमन करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान जोगावा मागितला.

सतत दहा मिनिट मिनिट मुख्यमंत्री आमदार सावरकर अनुप धोत्रे प्रकाश भारसाकळे चर्चा विनिमय केला व या भागाच्या परिस्थिती व विकासाचे कामा संदर्भात आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी आयोध्या येथील श्री राम लला मंदिराच्या धर्म ध्वजाचा उल्लेख करतात जय श्रीराम गगनभेदी नाऱ्यांनी परिसर दुमदुमले हिवरखेड अकोट आणि तेल्हारा या भागातील 15 किलोमीटर एरिया संपूर्ण भाजपामय झाले होते. यावेळी अकोट तेलारा, हिवरखेड वचननामा प्रकाशित आमदार फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande