
अकोला, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।चार्जिंग वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना आपण रोज ऐकतो. अशीच एक घटना अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात घडली. ज्यामध्ये चार्जिंग वाहनाला भीषण आगीची घटना घडली. या घटनेत वाहन जळून खाक झाले असून वाहन मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काजीपुरा येथील काजी शाह खालिद खान उर्फ काजी रफत खान यांनी वर्षभरापूर्वी डाबकी रोडवरील एका शोरूममधून हिंदुस्थान पॉवर नावाच्या कंपनीची चार्जिंग गाडी खरेदी केली होती. नेहमीप्रमाणेच त्यांचा मुलगा चार्जिंगसाठी लावून झोपला, गाडीमधून मोठा आवाज आल्याने काजी मेहंदी हसन यांनी पाहिले गाडी आगीत जळून खाक झाल्याचे दिसले, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे