
अकोला, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। मुर्तीजापुर उपविभागातील बार्शीटाकळी तालुक्यातील नवीन शेत रस्त्याच्या निर्मिती करिता उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर आणि ना. तहसीलदार बार्शीटाकळी यांच्याकडून देण्यात आलेल्या आदेशावर न्यायालयाने स्थगनादेश काढून पुढील कारवाई थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शंकर नीलकंठ भांडे यांची बार्शीटाकळी तालुक्यात 81 आर शेत जमीन आहे या शेतजमिनीला मुळातच शिवदांड रस्ता असताना सुद्धा मामलेदार कायद्यानुसार नायब तहसीलदार बार्शीटाकळी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात नवीन रस्त्यासाठी आदेश करून सोमवारी दि.२४ नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत नवीन रस्ता निर्मितीचे फर्मान सोडले होते ज्यावर न्यायालयात शंकर भांडे यांनी धाव घेत दावा दाखल केला ज्यामध्ये विद्यमान दहावे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एन डी जाधव यांच्या न्यायालयाने विधीज्ञांचा प्रभावी आणि मुद्देसूद युक्तिवाद ऐकून महसूल विभागाने दिलेल्या रस्ता निर्मितीच्या आदेशावर स्थगनादेश दिला आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे