अलिबागमध्ये रंगली प्रचाराची रणधुमाळी
रायगड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।थेट नगराध्यक्षपदासाठी अक्षया प्रशांत नाईक तर नगरसेवकपदासाठी प्रभाग सातमधून ॲड. मानसी संतोष म्हात्रे आणि अभय म्हामुणकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदारसंघातील विकास, पाणीपुरवठा, रस्ते सु
अलिबाग प्रभाग ७ रंगला; मानसी म्हात्रे आणि अभय म्हामुणकरांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


रायगड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।थेट नगराध्यक्षपदासाठी अक्षया प्रशांत नाईक तर नगरसेवकपदासाठी प्रभाग सातमधून ॲड. मानसी संतोष म्हात्रे आणि अभय म्हामुणकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदारसंघातील विकास, पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा, कचरा व्यवस्थापन आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस भूमिका मांडण्याचे आश्वासन दोन्ही उमेदवारांनी दिले.

या प्रचार फेरीत अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सतीश प्रधान, शेकाप तालुका कार्यालयीन चिटणीस अशोक प्रधान, ॲड. संतोष म्हात्रे, विवेक म्हात्रे, रितेश म्हात्रे, महेंद्र पाटील, अभि पारसनीस, प्रमोद पाटील, अविनाश सुर्वे, अनिकेत झालेराव, तेजस साळवी, आशिष थळे, प्रशांत जाधव, प्रथमेश आणि मयुरेश आंबवणे, विश्वेष पिकळे, भूषण जगे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या.प्रभाग सातमध्ये यावेळी दिसलेला उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीचा प्रचार वेग घेत असल्याचे स्पष्ट झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande