डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेला चार दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) - भाजपा नेत्या तथा राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अनंत गर्जेला काल, रविवारी मध्यरात्री एक वाजता अटक करण्यात आली
अनंत गर्जे


मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) - भाजपा नेत्या तथा राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अनंत गर्जेला काल, रविवारी मध्यरात्री एक वाजता अटक करण्यात आली. आज, सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर, चार दिवसांची, २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. अनंत गर्जे आणि गौरी यांच्या विवाहाला वर्षही झाले नव्हते. मुलीच्या आत्महत्येनंतर गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले. त्यामुळे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी थेट वरळी पोलीस ठाणे गाठत अनंत गर्जेसह त्याच्या कुटुंबीयांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत संबंधितांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला होता.

अनंत गर्जेंच्या पत्नी गौरी पालवे-गर्जे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेंवर केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी आज अनंत गर्जेंना कोर्टात पोलीस कोठडीसाठी हजर करण्यात आले. कोर्टाने अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चार दिवसांच्या पोलिस कोठडीच्या चौकशीतून पोलिसांना काय नवी माहिती मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

वरळी पोलिसांनी गौरी पालवे गर्जे आत्महत्येप्रकरणी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अनंत गौरीला टॉर्चर करत होता. तिचा छळ करत होता. कारण गौरीला अनंतबाबत काही गोष्टी समजल्या होत्या. अनंतचं अफेअर चाललं होतं आणि ते गौरीला कळलं होतं. गौरीच्या लग्नात तिच्या वडिलांनी ६० लाख रुपये खर्च केला होता. लग्नानंतर दोन महिने बरे गेले. त्यानंतर तिला अनंतने छळायला सुरुवात केली होती, असा गंभीर आरोप गौरीचे मामा शिवदास यांनी केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande