
बीड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात बीड शहरातील प्रभाग क्र.09 मधील उबाठाचे उपजिल्हाप्रमुख राजू महुवाले तर प्रभाग क्र.01 मधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश शिंदे यांनी व विविध पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी त्यांचे योगेश क्षीरसागर यांनी स्वागत करत बीड नगर परिषदेत भाजपाची सत्ता आणण्यासाठी ताकदीने कामाला लागावे असे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, सर्जेराव तांदळे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.सौ.ज्योती रविंद्र घुंबरे, अशोक लोढा, रवींद्र कदम, चंद्रकांत फड, नगरसेवक पदाचे उमेदवार परमेश्वर धारकर, दत्ता गायकवाड, मुकेश कुटे, डॉ.लक्ष्मण जाधव, भूषण पवार, डॉ.वनवे, डॉ.रमेश शिंदे, अक्षय रणखांब, बालाजी पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis