रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात रक्तदान शिबिर
रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन पदवीधर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यामध्ये ७५ जण
रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात रक्तदान शिबिर


रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन पदवीधर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यामध्ये ७५ जणांनी सहभाग नोंदवला व ५२ युनिट्स रक्त जमा झाले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वैभवी लक्ष्मी ब्लड बँक समन्वयक अजय भिडे, मनोज पाटणकर व डॉ. संजय केतकर, महेश नाईक, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, सुवर्ण महोत्सवाचे समन्वयक प्रा. वैभव कानिटकर उपस्थित होते. नोंदणी प्रक्रिया, तपासणी प्रक्रिया, समुपदेशन सेल, रक्तदानाची प्रक्रिया, विश्रामिका, स्नॅक्स व्यवस्था, कार्ड व प्रमाणपत्र वितरण व्यवस्था या सर्व बाबतची माहिती शिबिर समन्वयक प्रा. स्नेहा पेवेकर, सदस्य प्रा. सीमा फळणीकर, प्रा. योगेश हळबे, प्रा. केतन नाईक, प्रा. प्रार्थना सावंत यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande