
नाशिक, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। सिडको महामंडळाने सर्वसामान्य, कामगार लोकांकरीता सिडको वसाहत निर्माण केली. ही घरे ९९ वर्षाच्या भाडेपट्टा कराराद्वारे घरधारकांना हस्तांतरित करण्यात आली. परंतु वर्षनुवर्षं सिडको कडून आकारले जाणारे विविध वाढीव कर/चार्जेस यात प्रमुखाने बांधकाम चार्जेस, हस्तांतर शुल्क, इ. बंधनकारक अशा मोठ्या रक्कमेचा भरणा करावा लागत असल्याने सिडकोचे घर खरेदी करणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर जात आहे.
यामुळे लोक सिडकोच्या घरांपेक्षा स्वतंत्र फ्लॅट खरेदीला अधिक पसंती देताना दिसत आहे. तर याउलट सिडको च्या घरांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांनी घरे विक्री करून स्वतंत्र फ्लॅटचा सोयीस्कर मार्ग निवडताना दिसत आहे.
सिडको घर घरेदी करतांना सिडकोच्या विविध प्रकारच्या अनेक जाचक अशा अटी/शर्ती चे पालन करावे लागते. याचबरोबर विविध कागदपत्रे ही तयार करावी लागत असल्याने खरेदीदारास मोठी रक्कम मोजावी लागते असे असताना बँका किंवा वित्तीय संस्था मात्र सिडकोच्या घरांसाठी कर्ज पुरवठा हा अतिशय कमी प्रमाणात व जास्त व्याज दराने करत असल्याचे दिसून येते त्यामुळे लोक आता सिडकोच्या घर खरेदीपेक्षा स्वतंत्र फ्लॅटला अधिक पसंती देताना दिसत आहे.
विविध शुल्क/चार्जेस सूट अथवा कमी करण्यात यावे
कर सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते - नवीन सिडको- योगेश भास्कर कातकाडे म्हणाले की, सिडको महामंडळाकडून देण्यात आलेल्या सदनिकांसाठी सिडको वासियांना आता मोठा खर्च करावा लागत आहे. घरांच्या मूळ किमती पेक्षाही मोठ्या प्रमाणावर वारस नोंद, बांधकाम परवानगी, स्टॅम्प ड्युटी व्यतिरिक्त हस्तांतर शुल्क, असे अनेक चार्जेस आकारण्यात येते. याबाबत सिडको महामंडळाने दखल घेऊन हे चार्जेस कमीत कमी आकारून काही शुल्कात सूट देऊन सिडको वासियांना दिलासा द्यावा.
---------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV