
छत्रपती संभाजीनगर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर येथे पदवीधर नोंदणी विषयक भाजपा शहर महिला मोर्चा कार्यकारिणी बैठक आमदार संजय केणेकर (प्रदेश महामंत्री, भाजप) यांच्या प्रमुख उपस्थितीत, भाजपा शहर कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या बैठकीत आगामी विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या रणनीती आखण्यात आल्या. अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी आमदार संजय केणेकर यांनी पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.या प्रसंगी पदवीधर नोंदणी प्रमुख प्रदेश सचिव किरण पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. दहिफळे , प्रदेश सचिव शालिनी बुंधे, मीना मिसाळ, छाया खाजेकर, राजेश मेहता, अरविंद डोणगावकर, मनीषा भन्साळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत पदवीधर नोंदणी मोहिमेला लोकसहभाग मिळवून देण्यासाठी व्यापक जनजागृती, युवक-विद्यार्थी संपर्क, सामाजिक माध्यमांवरील समन्वयित मोहीम आणि बूथस्तरीय नियोजन या बाबींचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा प्रभावशाली विजय निश्चित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis