
बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम; विजेते जाहीर
परभणी, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय लोककलांचे वैभव, परंपरा आणि सांस्कृतिक विविधता यांचा मनमोहक जल्लोष परभणीमध्ये रंगला. बालरंगभूमी परीक्षा मुंबई यांच्या संकल्पनेतून बालरंग परिषद शाखा परभणीच्या वतीने आयोजित “जल्लोष लोककलेचा” या उपक्रमात जिल्हाभरातील 500 हून अधिक बालकलावंतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रसिकांना मंत्रमुग्ध केले. नृत्य, गायन आणि वादन या स्पर्धांमधून उभरत्या प्रतिभावंतांनी लोककलांची झगमगती परंपरा उजाळून दाखवली.
कार्यक्रम कौस्तुभ मंगल कार्यालयात भव्यदिव्य वातावरणात संपन्न झाला.
या महोत्सवास राज्य अध्यक्षा नीलम शिर्के सामंत, कवी प्रा. इंद्रजीत भालेराव, विजय करभाजन, प्रा. रवीशंकर झिंगरे, किशोर पुराणिक, गिरीश कर्हाडे, परभणी बालरंगभूमी अध्यक्ष आबा ढोले, उपाध्यक्ष प्रा. नितीन लोहट आदी उपस्थित होते. जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
परभणी शाखेचे अध्यक्ष आबा ढोले यांच्यासह प्रा. नितीन लोहट, संजय पांडे, प्रमोद बल्लाळ, मनीषा उमरीकर, सचिन आडे, दिनकर देशपांडे, राजू वाघ, बालाजी दामुके, संदीप राठोड, शैलेश ढगे, लक्ष्मीकांत जोगेवार, सिद्धेश्वर जाधव, अनिकेत शेंडे, कुलदीप उंडाळकर, प्रकाश बारबिंड, प्रा. संजय गजमल आदींनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकले. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
समूह नृत्य स्पर्धेत गांधी विद्यालय कृषी सारथी कॉलनी, परभणी – सर्वोत्कृष्ट, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पोखर्णी नृसिंह – उत्कृष्ट, रायरेश्वर विद्यालय, धर्मापुरी – उत्तम, नृसिंह विद्यामंदिर, पोखर्णी – प्रशंसनीय, मराठवाडा हायस्कूल, परभणी – प्रशंसनीय, जिजाऊ ज्ञानतीर्थ, पाथरी रोड – प्रशंसनीय, समूह गायन स्पर्धेत कै. रावसाहेब जामकर विद्यालय, परभणी, रायरेश्वर माध्यमिक विद्यालय, धर्मापुरी, एन. व्ही. एस. मराठवाडा हायस्कूल, परभणी, गोंधळ महर्षी राजारामबापू कदम सेवाभावी संस्था, बाल विद्यामंदिर, नानलपेठ, परभणी, एकल वादन स्पर्धेत कृष्णा खंदारे, साईनाथ सुक्ते, स्वराज परांडे, हर्षद गायकवाड, श्वेता घुगे, एकल गायन स्पर्धेत कार्तिक सांगळे, शौनक दुधगांवकर, साईराज सुक्ते, श्रेयस कदम, समर्थ कदम, एकल नृत्य स्पर्धेत अक्षरा भालेराव, स्वरा काळे, राजवी दळवी, शुभ्रा भारती, मधुरा आमडेकर यांनी पारितोषिक पटकावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis