रत्नागिरी : खारवी समाज पतसंस्थेच्या पूर्णगड शाखेतर्फे सहकार सप्ताह
रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पूर्णगड शाखेतर्फे सहकार सप्ताहानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चेअरमन संतोष पावरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्
रत्नागिरी : खारवी समाज पतसंस्थेच्या पूर्णगड शाखेतर्फे सहकार सप्ताह


रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पूर्णगड शाखेतर्फे सहकार सप्ताहानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

चेअरमन संतोष पावरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पूर्णगड क्र. १, पूर्णगड खारवीवाडा, गावडे आंबेरे खारवीवाडा, मेर्वी शाळा या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.

पतसंस्थेने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवून एक वेगळा ठसा उमटवला आहे.

या उपक्रमाला पूर्णगड शाखेचे शाखा पालक वासुदेव वाघे, जयवंत डोर्लेकर, शाखा अधिकारी निखिल आंबेरकर, पर्णिका आंबेरकर, सदिच्छा पावसकर, सौ. रिद्धी आडविरकर, हिदायत भाटकर, सुधीर कातळकर, श्री.जाधव, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेट्ये, शिक्षिक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

समाजात बचतीची जनजागृती व्हावी, समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा या हेतून प्रेरित होऊन झालेल्या या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande