
मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) - फक्त काही दिवसांवर आलेला 'एलईडी एक्स्पो नवी दिल्ली २०२५' चा ३० वा वर्धापनदिन भारतातील प्रकाश उद्योगासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरत आहे. २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत नवी दिल्लीतील यशभूमी येथे हा एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे.
एलईडी आणि स्मार्ट लाइटिंग तंत्रज्ञानासाठी देशातील आघाडीचा व्यापार मेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण आवृत्तीत २५० हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार आहेत. यामध्ये ७५ नव्याने सहभागी होणारे प्रदर्शक आहेत, जे ६,००० हून अधिक उत्पादने आणि २,००० ब्रँड्सचे प्रदर्शन करतील. या वर्षीचा शो तीन दशकांच्या नाविन्यपूर्णतेला, उद्योग सहकार्याला आणि एलईडी लाइटिंगच्या उल्लेखनीय उत्क्रांतीला समर्पित आहे, ज्यामुळे भारताचा स्मार्ट, अधिक हरित आणि ऊर्जा-कार्यक्षम पायाभूत सुविधांकडे प्रवास सुरू झाला आहे.
एलईडी लाइटिंगचा उद्योग आता वेगळ्या टप्प्यावर जात असल्याचे अधोरेखित करताना, मेसे फ्रँकफर्ट एशिया होल्डिंग्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि बोर्ड सदस्य श्री. राज मानेक म्हणाले“भारतातील एलईडी लाइटिंग उद्योगाने गेल्या काही वर्षांत वाढत्या अनुप्रयोगांसह अत्यंत सकारात्मक कल दर्शविला आहे. देशांतर्गत नवकल्पनाकार आव्हानांना कसे तोंड देत आहेत आणि यशस्वीरित्या वैविध्यपूर्ण होत आहेत, हे पाहण्यासाठी आणि मजबूत व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी या एक्स्पोमध्ये उद्योगाला मोठी संधी आहे.
श्री. मानेक पुढे म्हणाले, सरकार देखील ‘व्हाइट गुड्स’साठीच्या पीएलआय योजनेसारख्या योजनांसह उद्योगाला पाठिंबा देत आहे. सजावटीचे दिवे स्मार्ट लाइटिंग, सौर दिवे आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांमध्ये वाढ झाल्यामुळे एलईडी लाइटिंग उद्योगासाठी ही योग्य वेळ आहे. एलईडी लाइटिंगचे स्वरूप केवळ साध्या प्रदीपनातून आधुनिक जागांचे वातावरण आणि सौंदर्यशास्त्र परिभाषित करण्यापर्यंत विकसित झाले आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी