
बीड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा कार्यकर्ता मेळावा मेळावा पार पडला.
पार्श्वभूमीवर महायुतीचा भव्य संयुक्तिक कार्यकर्ता मेळावा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले,10 महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरू आहे. आज इथे एक माणूस नाही, असे वक्तव्य केले. यामुळे धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली की काय? अशी चर्चा आता रंगली आहे.
धनंजय मुंडे भाषणात म्हणाले की, महायुतीचे सर्व उमदेवार आपण निवडून आणून महाराष्ट्राला दाखवून देऊ. ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची, स्वाभिमानाची, अभिमानाची आहे. गेल्या एक वर्षापासून परळीला ज्यांनी बदनाम केले, त्याला उत्तर द्यायचे आहे. दोस्तीमध्ये कुस्ती नाही. मी माझ्या जीवनात कुठलीच निवडणूक सोपी घेतली नाही. परळीकरांचे ऋण मी फेडू शकत नाही. परळीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल. तीर्थक्षेत्र विकासाची कामे परळीत होत आहेत. याच वर्षात ही सर्व कामे करायची आहेत. समोरच्याच व्हिजन आम्हाला माहित नाही. समोरचा माणूस तुतारी घेऊन आला. माझ्यावर अनेक वार झाले, पण मी डगमगलो नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, उठसूट परळीवर आरोप झाले, नाथराला नाव ठेवले. माझं सर्व काम महायुतीचे सहकारी करतात. हा विजय ऐतिहासिक करण्याची जबाबदारी माझी आणि ताईची आहे. आज पासून 2 तारखेपर्यंत गप्प बसायचे नाही. मी जास्त मतांनी निवडून आलो नसतो तर मला त्रास झाला नसता. परळीतील मातीसाठी इथेच प्राण गेले तरी चालेल. आज 10 महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरू आहे. आज इथे एक माणूस नाही, त्यांनी म्हटले. यामुळे धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण काढली का? अशी चर्चा आता रंगली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis