खासदार डॉ. बोंडे यांना दुसऱ्यांदा धमकीचा 'कॉल', वरूड येथून युवक ताब्यात
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) खासदार डॉ. अनिल बोंडे यांना रविवारी अनोळखी व्यक्तीने फोन करून शिवीगाळ केली आणि धमकी देत खूप महागात पडेल, असे म्हणत फोन बंद केला. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मोबाईलचे लोकेशन घेतले आणि सायंकाळप
खासदार डॉ. बोंडे यांना दुसऱ्यांदा धमकीचा 'कॉल' राजापेठ पोलिसांनी वरूड येथून घेतले युवकाला ताब्यात


अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.)

खासदार डॉ. अनिल बोंडे यांना रविवारी अनोळखी व्यक्तीने फोन करून शिवीगाळ केली आणि धमकी देत खूप महागात पडेल, असे म्हणत फोन बंद केला. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मोबाईलचे लोकेशन घेतले आणि सायंकाळपर्यंत त्याला वरुड येथून अटक केली. देवेंद्र रामभाऊ खेरडे (४५, रा. वरूड) असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे. तो भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे समजते.

याप्रकरणात राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस फोन करणाऱ्याच्य शोधात आहेत. पोलिसांच्या हाती काही ठोस माहिती लागली नाही. दरम्यान रविवारी (दि.२३) सकाळी पुन्हा खासदार डॉ. अनिल बोंडे यांना पुन्हा अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने शिवीगाळ करीत धमकी दिली. तसेच तुला खूप महागात पडेल असे म्हणत मोबाईल बंद केला. घटनेनंतर डॉ. बोंडे यांनी प्रथम त्यांचे स्विय सचिव रवीकिरण शरदराव वाघमारे यांना हा प्रकार सांगितला. तसेच सायबर पोलिसांना फोन करून हा घटनाक्रम सांगितला, त्यानंतर रवीकिरण वाघमारे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी तत्काळ फोन करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरची माहिती घेतली असता वरुड येथे राहणाऱ्या हर्षली नावाच्या महिलेच्या नावावर सीम असल्याचे स्पष्ट झाले. राजापेठ पोलिसांचे एक पथक सकाळीच वरुडला रवाना झाले. दिवसभर पोलिसांनी संबंधित मोबाईल धारकाचा शोध घेतला, परंतु काही माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी पोलिसांना मोबाईलचे लोकेशन मिळताच पोलीस महिलेच्या घरी पोहोचले. चौकशी केली असता संबंधित मोबाईल नंबर महिलेचा पती देवेंद्र हा वापरत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी देवेंद्र खेरडेला ताब्यात घेतले आणि विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने फोन केल्याची कबुली दिली. परंतु कुठल्याच प्रकारची धमकी दिली नाही. डॉ. अनिल बोंडे हे आमच्या मतदार संघातील आहेत आणि त्यांच्याकडे काम होते. परंतु त्यांनी काम केले नाही. त्यामुळे कामाबाबत विचारपुस केली आणि महागात पडेल असे म्हटले, अशी कबुली संबंधित व्यक्तीने दिली.भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांना आठ दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीने फोन करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande