रत्नागिरी : महायुतीचे पदाधिकारी एकदिलाने काम करणार -  ॲड. पटवर्धन, पंडित
रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : राजापूर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजापूरवासीय महायुतीवर विश्वास दाखवतील आणि महायुतीच्या विजयाचा झेंडा फडकेल, असा दावा भाजपचे निरीक्षक ॲड. दीपक पटवर्धन आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी पत्रकार पर
रत्नागिरी : महायुतीचे पदाधिकारी एकदिलाने काम करणार -  ॲड. पटवर्धन, पंडित


रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : राजापूर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजापूरवासीय महायुतीवर विश्वास दाखवतील आणि महायुतीच्या विजयाचा झेंडा फडकेल, असा दावा भाजपचे निरीक्षक ॲड. दीपक पटवर्धन आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत केला.

महायुतीची सत्ता राजापूर नगरपालिकेमध्ये येण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापुरात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यानंतर जिल्हाप्रमुख श्री. पंडित आणि भाजपचे निरीक्षक पटवर्धन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.श्री. पंडित म्हणाले, भविष्यामध्ये राजापूर शहराच्या विकासाला बॅकलॉग भरून काढायचा आहे. त्यामुळे शहरातील जनता सत्ता हातात देईल. नगराध्यक्षपदासह सर्व जागा आम्ही जिंकू. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांची समजूत काढण्याचे काम सुरू असून दोन दिवसात त्यावरही योग्य निर्णय होईल, अशी माहिती भाजपाचे पक्ष निरीक्षक ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande