
बीड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
माजलगाव नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार पवार गट एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. प्रचारात वैयक्तिक टीका, आरोप-प्रत्यारोप यांना ऊत आला आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे पूर्णपणे बाजूला पडले आहेत.
दोन्ही गटांचे नेते व्यासपीठावरून एकमेकांवर टीका करण्यातच वेळ घालवत आहेत. विकास आराखड्याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात ते अपयशी ठरत आहेत. या आरोपांमुळे मतदारांमध्ये नाराजी वाढली आहे. खरा विकास कोण करणार, हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, बसस्थानकाचा प्रश्न, पावसाळ्यातील
राजकारण थांबवणे, कामांच्या गुणक्तेची हमी, पाणीपुरवठा आणि रस्त्यांवरील तातडीचे उपाय, दरवर्षीच्या तक्रारींवर कायमस्वरूपी उपाययोजना अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी दररोज घराघरातून कचरा संकलन आणि प्रक्रिया केंद्र उभारणीची गरज आहे. यासह विविध विकास कामांची शहराला गरज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis