
लातूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराचा शुभारंभ सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
अहमदपूरच्या विकासासाठी कार्यरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ह्या शुभारंभाला उपस्थिती दर्शवली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की,आजपर्यंत अहमदपूरकरांनी मला त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या विश्वासानं साथ दिली, त्याच विश्वासानं अहमदपूरच्या विकासासाठी या निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांना देखील भक्कम साथ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis