रायगड : भीषण अपघात 22 जखमी 10 गंभीर
रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक आज, सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. खासगी बसच्या या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवासी जखमी झाले. पुण्याहून खेडच्या
रायगड  : भीषण अपघात 22 जखमी 10 गंभीर


रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक आज, सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. खासगी बसच्या या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवासी जखमी झाले.

पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खासगी ट्रॅव्हलर बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या अडथळ्यांना धडक देत सुमारे ४५ फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले असून त्यातील १० प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे एक मार्ग बंद ठेवण्यात आला होता. पहाटे धुके असल्याने चालकाला अडथळे दिसले नाहीत. त्यामुळे अपघात घडल्याचे सांगण्यात येते. बसची थेट दरीत कोसळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत जखमींना वर काढले. पोलिस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

अपघातानंतर खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमींची नावे अशी - शामल विजय अंजर्लेकर (वय ४० रा. गिम्हवणे, दापोली), काजल मारुती शिगवण (२३ रा. दमामे, दापोली), दिलीप शिवराम मोहिते (५५ रा. तळसर, चिपळूण), अमरनाथ मिलिंद कांबळे ( २७ रा. लातूर), दीपाली दत्ताराम नाचरे (२७ रा. भडवणे, दापोली), प्रतीक प्रकाश गुरव ( २२ रा. शिरवली, खेड), प्रिया प्रकाश गुरव ( २३ रा. शिरवली, खेड), आळंदी बालाजी नाचरे ( ७४ रा. दमामे, दापोली), सर्वेश दीपक गुहागरकर (२२ रा. आडे, दापोली), मयूरी मारुती शिगवण (४५ रा. दमामे, दापोली). याशिवाय चालक, वाहक तसेच इतर दहा प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande