
नांदेड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
कारखान्याचा ऊसतोडणी व वाहतूक खर्च हा वाजवी असल्याची खात्री करून गाळपास ऊस देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जवळच्या कारखान्याची निवड करावी. सरासरी ऊसतोडणी व वाहतूक खर्च जर शेतकऱ्यांना जास्त वाटत असेल तर संबंधित कारखान्याच्या कार्यक्रमानुसार शेतकऱ्यास स्वतः ऊसतोडणी करुन कारखान्यास ऊस गाळपासाठी नेता येईल. याकडेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन साखर आयुक्त यांच्या निर्देशानुसार प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड यांनी केले आहे.
सद्यस्थितीच्या पद्धतीनुसार कारखान्यांमार्फत ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणी करुन शेतकऱ्यांच्यावतीने त्यांच्या ऊसाची तोडणी व वाहतूक केली जाते. ही ऊस तोडणी व वाहतूकीपोटी आलेला खर्च हा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या ढोबळ रास्त व किफायतशीर दराच्या (एफ.आर.पी) देय रकमेतून कपात करण्यात येतो. त्यानुषंगाने नांदेड प्रादेशिक विभागातील ऊस उत्पादक शेतक-यांना गाळप हंगाम 2024-25 या वर्षाच्या ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची माहिती देण्यात आली आहे, विभागातील सर्व शेतकऱ्यांना याची नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेडचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) विश्वास देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जिल्हा, सांकेतांक, कारखान्याचे पूर्ण नाव, प्रकार, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) यानुसार पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे.
नांदेड जिल्हा
अर्धापूर तालुका भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. लक्ष्मीनगर- (सांकेतांक 40101), प्रकार- सहकारी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 888.38.
हदगाव तालुका श्री सुभाष शुगर प्रा. लि. हदगाव- (सांकेतांक 39101), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 888.38.
उमरी तालुका एम.व्ही.के.अँग्रो फुडस प्रॉडक्टस् लि. वाघलवाडा- (सांकेतांक 32301), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 906.57.
नायगाव तालुका कुंटुरकर शुगर अॅन्ड अग्रो प्रा. ॲन्ड अग्रो प्रा. लि. कुंटुर- (सांकेतांक 39301), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 950.36.
लोहा तालुका ट्वेन्टीवन शुगर लि., यु-3 शिवणी- (सांकेतांक 69045), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 1078.76.
मुखेड तालुका शिवाजी सर्व्हीस स्टेशन मांजरी-बा-हाळी- (सांकेतांक 53009), प्रकार- खाजगी, सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च (रु. प्रति मे. टन) 865.24.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis