
श्री गुरु तेगबहादुर साहिब यांच्या ३५० व्या बलिदान दिवसानिमित्त
नांदेड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
धर्म आणि मानवतेचे रक्षक, त्याग व बलिदानाचे प्रतीक ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिब यांच्या ३५० व्या बलिदान दिवसानिमित्त नांदेड शहरात आयोजित सद्भावना रॅली तथा अल्पोपहार वितरण कार्यक्रम सामाजिक ऐक्याच्या संदेशासह संपन्न झाला.
धार्मिक सहिष्णुता, मानवता व सामाजिक ऐक्याचा संदेश देत ‘हिंद की चादर’ श्रद्धेय गुरु तेगबहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या बलिदान दिवसानिमित्त नांदेड शहरात भव्य सद्भावना रॅली तसेच अल्पोपहार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. माजी आमदार अमरनाथ राजूरकर, अध्यक्ष—भाजपा नांदेड महानगर, तसेच नांदेड महानगर भाजपचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते. सर्वांनी रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहन दिले.
ही सद्भावना रॅली गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब प्रशासन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. नांदेड शहरातील विविध धर्मीय बांधव, सामाजिक संस्था, युवक मंडळे, विद्यार्थी संघटनांनी उत्साहाने सहभाग नोंदवून सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकता आणि मानवतेचे मूल्य दृढ करण्याचा संदेश दिला.
रॅली दरम्यान सहभागी विद्यार्थी व नागरिकांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात गुरु तेगबहादुर साहिब यांच्या बलिदानाच्या प्रेरणादायी परंपरेचे स्मरण करून धर्मस्वातंत्र्य, मानवतेची रक्षा आणि सद्भावनेचा संदेश देण्यात आला. रॅलीचे संपूर्ण वातावरण गुरुतेगबहादुर साहिब यांच्या सार्वत्रिक मानवतावादी विचारांनी भारलेले होते.
स. गुरुदीप सिंह संधू, मराठवाडा प्रमुख भा.ज.पा. अल्पसंख्यांक मोर्चा आणि सहकारी यांच्या वतीने अल्पोपहाराची सेवा करण्यात आली. सदस्य शीख समुदाय समन्वय समिती अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र शासन अमरदीप सिंघ कुंजीवाले यांच्या तर्फे
शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis