छ. संभाजीनगर–परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासंदर्भात विशेष बैठक
छत्रपती संभाजीनगर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर–परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबतची महत्वपूर्ण बैठक भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष श्री.किशोर शितोळे निवासस्थानी स
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर–परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबतची महत्वपूर्ण बैठक भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष श्री.किशोर शितोळे निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांची उपस्थिती होती

या बैठकीत बाधित नागरिकांच्या अडचणी, पुनर्वसनाशी संबंधित अपेक्षा आणि आवश्यक समन्वयाची गरज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी प्रत्यक्ष मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रशासकीय स्तरावर योग्य ती कार्यवाही गतीमान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रेल्वे दुहेरीकरणामुळे होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि नागरिकांचे हित जपण्यासाठी पुढील पाठपुरावा तातडीने करण्यात येणार आहे. असे खासदार डॉक्टर कराड यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande