छ. संभाजीनगर : शांतीगिरी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य यज्ञ सोहळा होणार संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। वेरूळ येथील जनार्दन स्वामी आश्रमात श्री १००८ परमपूज्य शांतीगिरी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. याच ठिकाणी शांतिगिरी
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। वेरूळ येथील जनार्दन स्वामी आश्रमात श्री १००८ परमपूज्य शांतीगिरी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. याच ठिकाणी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे.या महत्त्वपूर्ण आध्यात्मिक सोहळ्याच्या तयारीची पाहणी खासदार कराड यांनी करून आवश्यक माहिती घेतली. भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि समाजकल्याणासाठी आयोजित हा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी खात्री व्यक्त करतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande