
छत्रपती संभाजीनगर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर येथे श्री गुरु तेगबहाद्दूर साहिब जी महाराज ३५० व्या प्रकाश पर्वानिमित्त भव्य शोभायात्रा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या पवित्र प्रसंगी अत्यंत श्रद्धा, भक्तीभाव आणि आदरभावनेने श्री गुरु तेगबहाद्दूर साहिब जी महाराजांच्या पावन नगर कीर्तन शोभायात्रेत अनेक भाविक भक्तांसह भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी सामील झाले होते
सिंधी कॉलनी गुरुद्वारा साहिब येथून प्रारंभ झालेली ही पवित्र यात्रा शहरातील मुख्य मार्गाने पुढे जात शहरगंज गुरुद्वारा साहिब येथे संपन्न झाली.
अमरप्रित चौक (दूध डेअरी सिग्नल) येथे भाजपा परिवाराने उभारलेल्या स्वागत मंचावर उपस्थित राहून सर्व कीर्तनी भक्तगणांचे आणि समाजबांधवांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले
यानंतर गुरुद्वारा परिसरात खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार संजय केणेकर यांनी उपस्थित राहून स्वच्छता व सेवा कार्यात सहभाग घेतला. शीख धर्माच्या सेवा, नम्रता व मानवसेवा या शाश्वत मूल्यांचे प्रतिक आहे. गुरु घरातील या पावन “सेवा परंपरेत” सहभागी होऊन गुरु महाराजांच्या चरणी विनम्रतापूर्वक श्रद्धांजली वाहिली.
गुरु तेगबहाद्दूर साहिब जींचे अद्वितीय बलिदान
काश्मिरी पंडितांवर आणि त्यांच्या धर्मस्वातंत्र्यावर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, नववे गुरु — श्री गुरु तेगबहाद्दूर साहिब — यांनी धर्म आणि मानवी स्वातंत्र्यासाठी स्वतःचा शीश अर्पण करून संपूर्ण जगाला मानवतेचा सर्वोच्च संदेश दिला.
त्यांच्या शिकवणी आजही प्रेरणा देते:
“कोई किसी को न सतावे, न डरने दे…”याच उदात्त त्याग, धर्मरक्षा आणि सर्वधर्मसमभावासाठी त्यांना जगभरात ‘हिंद दी चादर’ म्हणून सन्मानित करण्यात येते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis