राष्ट्रीय खो-खो खेळाडूंच्या पाठीवर क्रीडा मंत्री कोकाटेंची कौतुकाची थाप
नाशिक, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। : नाशिक जिल्हा खो - खो असोसिएशन संचालित स्व. सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीच्या माध्यमातून सराव करणाऱ्या खेळाडूंनी या वर्षी उत्तम कामगिरी नोंदवली आहे. १४, १७ आणि १९ वर्षा आतील ६९ व्या शालेय राष्ट्रीय स्
राष्ट्रीय खो खो खेळाडूंच्या पाठीवर क्रीडा मंत्री  कोकाटेची कौतुकाची थाप.


नाशिक, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

: नाशिक जिल्हा खो - खो असोसिएशन संचालित स्व. सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीच्या माध्यमातून सराव करणाऱ्या खेळाडूंनी या वर्षी उत्तम कामगिरी नोंदवली आहे. १४, १७ आणि १९ वर्षा आतील ६९ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन संचलित स्व. सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. केकरी राजस्थान येथे दिनांक १६ ते २१ जानेवारी २६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षा आतील मुलींच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी शासकीय कन्या शाळेच्या कु. सृष्टी शिंदे हिची निवड झाली आहे.अयोध्या, उत्तर प्रदेश येथे दिनांक २० ते २४ डिसेंबर दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या १७ वर्षा आतील शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी शासकीय कन्या शाळेच्या भूमिका खोटरे हिची निवड झाली आहे. गतवर्षी १४ वर्षा आतील शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या राज्याच्या संघात भूमिका खोटरे हिचा समावेश होता. जबलपूर मध्यप्रदेश येथे दिनांक २० ते २४ डिसेंबर दरम्यान १९ वर्षा आतील शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी वाय. डी. बिटको कन्या शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयाच्या सुषमा चौधरी, ताई पवार, कौसल्या कहाण्डोळे या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. सुषमाने गतवर्षी १८ आणि १९ अशा दोन वयोगटात तर कौसल्या हिने १७ आणि १८ अशा दोन वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.या पाच खेळाडूंनी क्रीडामंत्री. माणिकराव कोकाटेयांची नाशिक येथे भेट घेतली. त्यावेळेस या खेळाडूंचे कौतुक केले . छयावेळेस जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी आणि क्रीडा मंत्र्यांचे OSD रवी नाईक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande