शिरजगाव मोझरीच्या गावकऱ्यांचा निर्धार, यावेळी उमेदवारी मिळेपर्यंत मागे हटणार नाही!
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरजगाव मोझरी गावात अनोखी एकजूट दिसून आली आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून गावाला उमेदवारी न मिळाल्याचा मनातील खदखद आता उफाळून आली असून, गावकऱ्यांनी याव
“शिरजगाव मोझरीच्या गावकऱ्यांचा निर्धार ....   यावेळी उमेदवारी मिळेपर्यंत मागे हटणार नाही!”


अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.)

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरजगाव मोझरी गावात अनोखी एकजूट दिसून आली आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून गावाला उमेदवारी न मिळाल्याचा मनातील खदखद आता उफाळून आली असून, गावकऱ्यांनी यावेळी ठाम आवाज उठवला आहे.

गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे उमेदवारीची विनंती केली. त्यांच्या मागणीला गावातील सर्वपक्षीय नेते, तरुणाई, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकदिलाने पाठिंबा दिला.शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत गावकऱ्यांचा सूर अत्यंत भावनिक होता.“गावासाठी काम करणाऱ्या माणसाला संधी द्या, आमचा आवाज नजरेआड करू नका…! शिरजगाव मोझरीला यावेळी न्याय मिळालाच पाहिजे!”

गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या अपेक्षांना आता उमेदवारीच्या रूपाने प्रतिसाद मिळावा, अशी गावाची सामूहिक भावना आहे. या एकजुटीमुळे काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, शिरजगाव मोझरीची ही निर्णायक भूमिका आगामी निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे वारस शिरजगाव मोझरी आहे. आमच्या गावातील एकोपा आम्ही वेळोवेळी दाखवला आहे. यापूर्वी सुद्धा गावातील उमेदवाराला बहुमतच दिले आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषदेची उमेदवारी काँग्रेसने शिरजगावात दिल्यास संपूर्ण गाव गावातील उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे.

- प्रकाश चिचखेडे, गावकरी

गावातील उमेदवार लायक आहे. गावाला यातून नेतृत्व मिळू शकते. काँग्रेसने गावात तिकीट दिल्यास एकमताने गावातील उमेदवाराचा मागे उभे राहणार आहे. उमेदवारी मागण्यासाठी सुद्धा ताकतीने मागणी करणार आहे.- विजय कुरळकर, सामाजिक कार्यकर्ते

यापूर्वी पंचायत समितीची उमेदवारी मागितली होती. त्यावेळी उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन येन वेळी उमेदवारी रद्द केली. काँग्रेस पक्षाकडून वेळोवेळी उमेदवारीसाठी शिरजगाव मोझरी दुर्लक्षित आहे. यावेळी तरी काँग्रेसने गावात जिल्हा परिषद उमेदवारी द्यावी . गावात उमेदवारी दिल्यास एकजुटीने काँग्रेसचा विजय करून दाखवू

- निरंजन कडू, सरपंच, शिरजगाव मोझरी

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande