कार्यकर्त्यांच्या बळावर अब की बार 100 पार - शंकर जगताप
पुणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकीय जीवनाचा प्रवास 2007 पासून सुरू झाला . त्यानंतर अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर पडत गेल्या. या जबाबदाऱ्यांना कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळाले. तुम्ही सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्यासोब
कार्यकर्त्यांच्या बळावर अब की बार 100 पार - शंकर जगताप


पुणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकीय जीवनाचा प्रवास 2007 पासून सुरू झाला . त्यानंतर अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर पडत गेल्या. या जबाबदाऱ्यांना कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळाले. तुम्ही सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत काम केले. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात . यामुळे प्रत्येक संघर्षाच्या प्रसंगी खंबीरपणे उभा राहिलो . याच कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ''अब की बार 100 पार'' हा नारा आपल्याला पूर्ण करायचा आहे असा निर्धार थेरगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी केला. थेरगावच्या याच व्यासपीठावर पुढील वर्षी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याही वर्षपूर्तीचा सोहळा आपण साजरा करू असा संकल्प देखील या निमित्ताने करण्यात आला.

आमदार शंकर जगताप यांच्या आमदारपदाची वर्षपूर्ती तसेच पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल थेरगाव, कामगार भावन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मंडलाध्यक्षांच्या तसेच प्रभागातील सदस्यांच्या वतीने आमदार शंकर जगताप यांना सन्मानित करण्यात आले. मेळाव्याला विधान परिषद आमदार उमा खापरे, अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सुजाता पालांडे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, तुषार हिंगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, सचिन साठे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष कुणाल वाव्हळकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडेगिरी, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, ज्येष्ठ उद्योजक उमेश चांदगुडे तसेच भाजपचे सर्व जिल्हा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, मंडळ प्रमुख, मंडल कार्यकारणी सदस्य प्रभाग अध्यक्ष, बुधप्रमुख, सर्व आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते या निमित्ताने उपस्थित होते. कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने महापालिका निवडणुकांसाठी मोठे शक्ती प्रदर्शन या निमित्ताने पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande