
सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
बार्शी येथील बबनराव शिंदे शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज कारखान्याची बनावट मेल आयडी तयार करुन २ हजार ३० पोते साखर घेऊन ७६ लाख ६०० रुपयांची फसवणूक केली असून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रफिक बाबा शेख(रा.कुंभारगाव,ता.करमाळा),मिनोज बाबा शेख(रा.गणपती विसर्जन घाट,बालेवाडी बाणेर पुणे), गजाला रफिक शेख(रा.ग्रॅन्डुअर पार्क,फ्लॅट बी १६०३ बालेवाडी, भारती विद्यापीठ जवळ पुणे),राजीव नेताजी मोरे(रा.बिरणवाडी, ता.तासगाव,जि.सांगली)ओंकार पवार(रा.तासगाव,जि.सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्याद कारखान्याचे रोखपाल अमोल संदीपान मोहिते यांनी दिली ही घटना १७ डिसेंबर २०२४ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली.बबनराव शिंदे शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याशी नाथबाबा अॅग्रो ट्रेड हब प्रा.लि.चे चालक रफिक शेख,मिनोज शेख,गजाला शेख व फर्मचे कामकाज पाहणारे राजीव मोरे,ओंकार पवार यांनी आपापसात संगनमत करुन,कारखान्याचा विश्वास संपादन केला. कारखान्याशी संबंधित असलेल्या कृष्णा एन्टरप्राईजेस यांची कारखान्याकडे जमा असलेली ४० लाख ६० हजार रुपये व लक्ष्य ट्रेड लिंक या फर्मच्या नावे जमा असलेली ३५ लाख ४० हजार रुपये रक्कम नाथबाबा अॅग्रो ट्रेड हब प्रा.लि.च्या खात्यावर जमा करण्यासाठी बनावट मेल आयडी तयार केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड