
पुणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
बाणेर परिसरात बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाई करत पाच जणांना अटक केली असून, त्यामध्ये एका राजकीय व्यक्तीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सुरेंद्र जगदाळे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईत आरोपींकडून ४५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीच्या चार जिवंत काडतुसांसह ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विनायक नागनाथ गायकवाड (२१, पिसोळी), विजय ऊर्फ चाँद काळे (३०, भालेकरनगर), जॉन ऊर्फ रिक्या जाधव (४०, जुनी सांगवी), विशाल कृष्णा गांधिले (४७, पॅनकार्ड रोड, बाणेर) आणि निसर्ग अर्जुन गांधिले (३७, ऋतुजा पार्क, बाणेर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अभय सुरेश ससाणे हा बेपत्ता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु