बार्शीत अडत व्यापारामध्ये मुनिमाकडून ११ लाख रुपयांचा अपहार
सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। बार्शी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्याच्या नावावर परस्पर भुसार मालाची खरेदी केली आणि व्यापाऱ्याच्या खात्यातून ११ लाख ६९ हजार ४७० रुपये व्यापाऱ्यास दिले संबंधित मालाची परस्पर विल्हेवाट करुन रकमे
बार्शीत अडत व्यापारामध्ये मुनिमाकडून ११ लाख रुपयांचा अपहार


सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

बार्शी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्याच्या नावावर परस्पर भुसार मालाची खरेदी केली आणि व्यापाऱ्याच्या खात्यातून ११ लाख ६९ हजार ४७० रुपये व्यापाऱ्यास दिले संबंधित मालाची परस्पर विल्हेवाट करुन रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात मुनिमा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सागर लक्ष्मण फफाळ(रा.फफाळवाडी,ता.बार्शी)असे गुन्हा दाखल झालेल्या मुनिमाचे नाव आहे व्यापारी सचिन देवीदास मडके(वय ४२ वर्षे,रा.दत्तनगर यांनी फिर्याद दाखल केली ही घटना २४ एप्रिल २०२५ ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली.फिर्यादीत असे म्हटले आहे की,मार्केट यार्डमध्ये प्लॉट नं.११२ येथे सचिन देर्वीदास मडके नावाने अडत दुकान असूून भुसार माल चिंच,तूर वगैरे खरेदीचा आधिकृत परवाना आहे दुकानात २०१६ पासून इतर मुनीमा प्रमाणेच सागर फपाळ मुनिम म्हणून कामास होता. खरेदी विक्रीचा व्यवहार पहात असे बाजारातून माल खरेदी करण्याचे काम त्याच्याकडे सोपविले होते १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुकानातील मुनीमार्फत दुकानातील स्टॉकची तपासणी केली असता स्टॉकमध्ये कमतरता आढळून आली. त्यानंतर १५ ऑक्टोंबर ते १७ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत संपूर्ण स्टॉकची व खरेदी केलेल्या मालाची पडताळणी केली असता २६ एप्रिल ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अन्नपुर्णा ट्रेडींग कंपनी कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी मार्केट यार्ड गाळा नं.५८ यांच्याकडून उडीद,तुर,चिंच असे माल खरेदी केल्याच्या खरेदी पावत्या निर्दशनास आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande