
सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
राज्यातील अल्प उत्पन्न गटातील व गरीब रुग्णांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य व केंद्र सरकारची प्रधानमंत्री आयुष्यमान भारत या योजनेचा विस्तार करताना उपचाराच्या पॅकेजेसची संख्या एक हजार 356 वरून ती दोन 399 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे बहुतेक सर्वच आजारांवरील उपचाराचा खर्च या दोन्ही योजनेतून केला जाणार आहे.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान भारतचे कार्ड निर्माण करावे लागणार आहे. या निर्णयानुसार आयुष्मानच्या कार्डची केवायसी करावी लागणार आहे. या योजनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सध्या रुग्णालयांची संख्या ही 900 आहेत. त्यात वाढ करण्यात येणार असून ती आता चार हजार 180 पर्यंत वाढवण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. तसेच या योजनेत प्राथमिक आरोग्य केंद्रांवर करता येणाऱ्या 25 नवीन उपचारांचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत (दीर्घकालीन आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे) कॉर्पस फंड अंतर्गत नव्या सुविधा दिली जाणार आहे. यासाठी शासनाने 204 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड